‘लाकडाचे कान’ काव्यसंग्रहाचे गुरुवारी प्रकाशन


दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजन
सातारा
ज्येष्ठ कवी व भाषणचिंतक, समीक्षक डॉ. केशव सखराम देशमुख यांच्या ‘लाकडाचे कान’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन गुरुवार दि. ५ जून रोजी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सायंकाळी ५.३० वाजता दीपलक्ष्ली सांस्कृतिक हाॅल, शनिवार पेठ, सातारा येथे संपन्न होणार आहे अशी माहिती असे म. सा. प., पुणे कार्यवाह शिरीष चिटणीस यांनी दिली
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ हे उपस्थित राहाणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण साहित्यिक प्रा. संभाजी लावंड यांची उपास्थिती राहील. ‘लाकडाचे कान’ या काव्यसंग्रहावर ख्यातनाम समीक्षक प्रा. डाॅ. देवानंद सोनटक्के हे विस्तृत भाष्य यावेळी करतील. तसेच डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या ‘लाकडाचे कान’ काव्यसंग्रहामधील वेचक, वेधक काही कवितांचे अभिवाचन खास रसिकांसाठी याप्रसंगी डॉ. अदिती काळमेख आणि शिल्या चिटणीस ह्या करणार आहेत. भाषातज्ञ आणि समीक्षक असलेल्या डाॅ. देशमुख यांनी अभिजात मराठी काव्यविश्वात आपल्या विषयसंपन्नता आणि काव्यशैलीच्या वेगळेपणामधून काव्यजाणिवांचे स्वतंत्र नवं दर्शन घडविलेले आहे. तरी ह्या वाङ्‌मयीन, भाषिक महत्वपूर्ण प्रकाशन समारंभास साहित्यप्रेमी वाचक, रसिक, लेखक, कवी यांनी आवर्जुन उपस्थित राहावे, असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!