पुण्यात पैठणीची चोरी


पावणे सात लाखांच्या ६ पैठणी लंपास
पुणे
पुण्यातीलएफसी रस्त्यावरील एका दुकानातून खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी भरदुपारी पावणे सात लाखांच्या ६ पैठणी साड्या चोरून नेल्या आहेत.
पोलिसांनी यातील सीसीटीव्हीची पडताळणी केली आहे. त्यानूसार पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात २५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे एफसी रस्त्यावरील सौदामीनी हॅन्डलुम साड्याचे दुकान आहे. गुडलक चौकाजवळ हे दुकान आहे. दरम्यान, रविवारी एफसी रोडवर मोठी गर्दी असते. याठिकाणी तरुणींची खरेदीसाठी झुंबड उडत असते. तत्पुर्वी दुपारी पावणे तीनच्या सुमारास दोन महिला त्याठिकाणी खरेदीसाठी आलेल्या होत्या. त्यांनी साड्यांची पाहणी केली. मात्र ६ पैठणी साड्या चोरून नेल्या. हा प्रकार उशीरा उघडकीस आल्यानंतर सोमवारी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!