सायन्स सेंटरतर्फे गणित कार्यशाळा
शनिवार दिनांक 17 मे रोजी आयोजन
सातारा
येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे शनिवार दिनांक 17 मे रोजी गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे सायन्स सेंटरच्या वर्ये येथील कार्यालयात ही कार्यशाळा होणार असून सकाळी दहा ते दुपारी चार या कालावधीमध्ये कार्यशाळेत गणितविषयक विविध माहितीपर उपक्रम राबवण्यात येणार आहेत
इयत्ता सहावी ते नववी या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा खुली असून कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी शंभर रुपये प्रवेश फी आहे या कार्यशाळेमध्ये घनफळ,क्षेत्रफळ, संख्य, वर्तुळ, कोनाचे प्रकार अशी विविध प्रकारांची माहिती देण्यात येणार आहे आणि गणिताची जादूही शिकवण्यात येणार आहे
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवावा चे आवाहन सायन्स सेंटरतर्फे करण्यात आले आहे