भावना ओतून तयार केलेले संगीत आजही लोकप्रिय
हार्मनी प्रस्तुत कार्यक्रमात मुकुंद फडके यांचे प्रतिपादन
सातारा
चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात संगीताशी संबंधित सर्वजण मनापासून काम करायचे. अशा प्रकारे भावना ओतून तयार केलेले संगीत अनेक वर्षानंतरआजही लोकप्रिय आहे .आधुनिक काळात तंत्राच्या अतिरिक्त वापरामुळे संगीतातील भावना हरवत चालली आहे,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मुकुंद फडके यांनी केले
हार्मनी प्रस्तुत गाने जो दिल को छुले हा वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मुकुंद फडके यांनी राज कपूर यांच्या पुण्यतिथीची आठवण करून देत जुनी गाणी आज ही रसिकानाच्या मन आणि ह्रदयावर राज्य करतात असे सांगितले आणि .लवकरच हार्मनी शतकपूर्ती करो या शुभेच्छा दिल्या.
विजय देशमुख यांनी हार्मनीच्या कराओके घरोघरी या संकल्पनेचे कौतुक केलं आणि हे सर्व निःस्वार्थ भावनेतून हार्मनी करत आहे. जुन्या गाण्यांचा वारसा या निमित्ताने जपत आहे असे सांगितले हेमंत कासार यांनी या कार्यक्रमाची वाहवा केली
शिरीष चिटणीस म्हणाले,रवींद्र खांडेकर प्रामाणिक पणे सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या कार्यक्रमाना उपस्थित राहून संगीत क्षेत्रात एक मोठं योगदान देत आहेत गायिका संगीता हेंद्रे यांची जिद्द चिकाटी मेहनत वाखाणण्याजोगी आहे दीपलक्ष्मी हा तुमच्या सर्वांचाच हॉल आहे येथे असे कार्यकेम नेहमी करत राहा
या वेळी हार्मनीचे नितीन मूळे, संगीता हेंद्रे, रवींद्र खांडेकर यांनी फिल्म स्टार जितेंद्र, अजय देवगण, जया प्रदा, जया भादुरी यांच्या एप्रिल महिन्यातील वाढदिवस थीमवर आधारित गाणी सादर केली.नितीन मूळे यांनी मुसाफिर हूं यारो,मस्त बहारोंका आशिक, हम तो तेरे आशिक,ढलं गया दिन हो गई श्याम
ही गाणी सादर करून रसिकाना डोलायला लावल. तर संगीता हेंद्रे यांनी तेरे मेरे मिलन की रैना, तुमसे बढकर दुनिया मे, राह मे उनसे,जाने जा ढुंढता फिर रहा,बोल रे पपी हरा, यशोदा का नंदलाला अशी मस्त गाणी रवींद्र खांडेकर व नितीन मूळे यांना साथ देत सादर केली रवींद्र खांडेकर यांनी जब किसी की तरफ
दिलं झुकने लगे, धक धक सेधडकना सिखा दे, एक बंजारा गाये अशी हटके सोलो गाणी सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केलं
फोटो ओळ
दीप प्रज्वलन करताना मुकुंद फडके,शेजारी नितीन मुळे,शिरीष चिटणीस,संगीत हेंद्रे,रवींद्र खांडेकर,विजय देशमुख,हेमंत कासार