नय्यरगिरी के संग राज की बात
कराडमध्ये शनिवारी स्वरसंस्कारतर्फे विशेष कार्यक्रम
सातारा
कराड येथील स्वरसंस्कार या संस्थेतर्फे शनिवार दिनांक सात जून रोजी संध्याकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे नय्यरगिरी के संग राज की बात
हा विशेष संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
संगीतकार ओ पी नय्यर आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांच्या जन्मशताब्दीचे निमित्त साधून सुमधुर गीतांची ही सफर आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती चित्रा कुलकर्णी यांचे असून संहिता संयोजन अभिजीत कुलकर्णी यांचे आहे या कार्यक्रमांमध्ये स्वर संस्कारचे रसिक गायक देवेंद्र साळुंखे, प्रशांत सातभाई, पियुष गोर, अरुण कुलकर्णी, सुप्रिया कुलकर्णी, संजीवनी पावसकर, मंजुषा कुलकर्णी, सुनिता मोहिरे, उषा थोरात, मंजुषा लिपारे, प्रफुल्लता लोहार,रेखा अडके, जयश्री भिवरे, अनिता व्यवहारे, अरुणा कवर, सुलभा तवटे ,प्रमोद कुंभार, विशाल नाटकर सादर करणार आहेत
यावेळी डॉ वहिदा कलमाडे आणि डॉक्टर चित्रा खानवेलकर सुसंवाद साधणार आहेत
या कार्यक्रमासाठी गिरीश कुलकर्णी सपना कुलकर्णी श्रीरंग कुलकर्णी यांचे तंत्र सहाय्य लाभले असून ध्वनी संयोजन सांगली येथील राजू सुपेकर सांभाळणार आहेत सर्व रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वरसंस्कार या संस्थेतर्फे करण्यात आले आहे