अष्टगंधारमध्ये आशा भोसले यांची गाणी


सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग चौथा १५ एप्रिल रोजी सायंकाळी दीपलक्ष्मी सांस्कृतीक हॉलमध्ये आयोजित केला गेला. हा कार्यक्रम महान गायिका आशा भोसले यांच्या गाण्यांवर आधारित होता.रॉयल म्युझिकल इव्हेंट्सच्या सौ. अपर्णा गायकवाड यांनी कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाबा भारे, विजय साबळे, डॉ. कामिनी पाटील, गुलाब सावंत, संगीता हेंद्रे व दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस हे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. पुनम धुमाळ यांचे सोबत रॉयलचे इतर गायकांनी त्यांना साथ संगत दिली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपली गायन कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी बोलताना बाबा भोरे यांनी अष्टगंधार ह्या मालिकेचे तसेच रॉयलच्या सौ अपर्णा गायकवाड यांचे तसेच सर्व कलाकारांचे कौतुक केले व खूप छान संकल्पना असल्याचे सांगितले.शिरीष चिटणीस यांनी देखील आपल्या शैलीमध्ये रॉयलच्या कलाकारांचे प्रोत्साहन वाढवले.या कार्यक्रमाचा पाचवा भाग हा दिनांक ३ मे रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० ह्या वेळेत होणार असून हा कार्यक्रम अरिजीतसिंग यांच्या निवडक गाण्यांवर आधारित आहे. हा कार्यक्रम रॉयल परिवाराचे प्रसाद मुंद्रावळे सादर करणार आहेत. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी ह्या कार्यक्रमाला ५.३० ते ८.३० ह्या वेळेत दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे उपस्थित राहून राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दीपलक्ष्मीचे अध्यक्ष शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इवेंट्स तर्फे करण्यात येत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!