जेष्ठ कवयित्री प्रा डॉ रामकली पावसकर यांचे निधन


सातारा

Advertisement

सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध कवयित्री, पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या मराठी विभागाच्या प्रमुख व निवृत्त प्रभारी प्राचार्य , ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या ज्येष्ठ भगिनी डॉ रामकली रमाकांत पावसकर ( ७७) यांचे सातारा येथील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये शनिवार दि 14 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमीतील गॅस दाहिनी मध्ये कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पुरस्कार योजनेसाठी त्यांनी बहुमोल आर्थिक सहाय्य केले आहे. त्यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये “निरव किनाऱ्यावर “( डिम्पल प्रकाशन ), हंबर ( चेतश्री प्रकाशन )
ओले अथांग श्वास (शब्दालय प्रकाशन ) सांजसावल्या -( डिम्पल प्रकाशन ) पावळण- (डिम्पल प्रकाशन) रें आभाळा — ( डिम्पल प्रकाशन ) या कविता संग्रहाचा समावेश आहे.
‘1980 नंतरची मराठी कविता प्रवृत्ती आणि प्रवाह ‘ या विषयावरील समीक्षा ग्रंथ ही स्वरूप प्रकाशन (औरंगाबाद ) द्वारे प्रसिद्ध आहे.
साहित्यिक , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!