शनिवारी सुरमयी शाम ” दिल का साझ”
दीपलक्ष्मी पतसंस्थेतर्फे मधुर गीतों का सफर कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित सुरमयी शाम ” दिल का साझ” मधुर गीतों का सफर कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल शनिवार पेठ सातारा येथे शनिवार दि.21 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
या गीत मैफिल कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेखा शेजवळ यांच्या हस्ते होणार असून डॉ.कामिनी पाटील, मुकुंद फडके, डॉ. लियाकत शेख, अनिल वाळिंबे, काका पाटील, शिरीष चिटणीस, सलीम शिकलगार मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Advertisement
या गीत मैफिलीमध्ये सलीम शिकलगार, सलीम सय्यद, शबाना शिकलगार, शरीफ शिकलगार, मोईन शिकलगार गायक कलाकार सहभाग घेणार आहेत.
सातारकर रसिकांनी “दिल का साझ ” मधुर गीतों का सफर कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन शिरीष चिटणीस यांनी केले आहे.

