गुरुवारी “यादो के झरोखो से ” गीत मैफिल


दीपलक्ष्मी पतसंस्था व विजय साबळे यांची प्रस्तुती
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा व विजय साबळे प्रस्तुत” यादो के झरोखो से ” हा स्वर्गीय मनोज कुमार यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यांची सुरेल मैफिल कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6.15 वाजता आयोजित केली आहे .
या गीत मैफिलिस प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद फडके,गुलाब सावंत, बाबा भोरे,विजय साबळे, शिरीष चिटणीस,विनायक भोसले मान्यवर
उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन विजय साबळे यांचे असून निवेदन दिपाली गीते करणार आहेत.
या मैफिलीमध्ये विजय साबळे , डॉ. सुनील पटवर्धन, सचिन शेरकर ,प्रकाश सावंत, चंद्रशेखर बोकील, अल्ताफ मुल्ला, ममता नरहरी, मंजिरी दीक्षित, वैशाली
चंद्रसालीगायक कलाकार आपली सुमधुर गीते सातारकर रसिक श्रोत्यांसाठी सादर करणार आहे.
या गीत मैफिलीस समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले तसेच विजय साबळे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!