राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत ‘नथिंग इज फेअर’ प्रथम


‘कळसूत्र’ द्वितीय, ‘आयाम’ तृतीय

Advertisement

सातारा
येथील शाहू कला अकादमीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत राजीव मुळ्ये यांच्या ‘नथिंग इज फेअर’ या एकांकिकेस प्रथम क्रमांक जाहीर झाला. रवींद्र इनामदार यांच्या ‘कळसूत्र’ एकांकिकेने दुसरा तर अमित मोहनराव देशमुख यांच्या ‘आयाम’ एकांकिकेने तिसरा क्रमांक पटकावला.
संकेत विजय तांडेल यांनी लिहिलेली ‘दोन हजार चाळीस’, प्रमोद पुजारी यांची ‘मुतायची चोरी’ आणि जुबेन अलिफ यांची ‘समीकरण’ या तीन एकांकिका उत्तेजनार्थ पारितोषिकांच्या मानकरी ठरल्या. अन्य साहित्यावर आधारित एकांकिकांच्या गटात रवींद्र इनामदार यांची ‘चाफा’ एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली, तर बाळकृष्ण शिंदे यांच्या ‘कफन’ एकांकिकेने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.
प्रसिद्ध नाटककार आणि कथा, पटकथा, संवादलेखक, दिग्दर्शक नितीन दीक्षित यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. पारितोषिक विजेत्या लेखकांना शनिवार, दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता सातारच्या शाहू कलामंदिरात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार मोहिते यांनी दिली. पारितोषिक वितरणानंतर शाहू कला अकादमी निर्मित ‘असं कधी होत नाही’ या पारितोषिक विजेत्या दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!