प्रा.मिलिंद जोशी,विनोद कुलकर्णी, सुनिताराजे पवार यांचा शनिवारी सत्कार


श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयातर्फे आयोजन
सातारा
सर्व साहित्य संस्थांची शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या अध्यक्षपदी प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाहपदी सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल श्रीमंत छत्रपती प्रतापसिंग महाराज (थोरले) नगर वाचनालयातर्फे या सर्वांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे
शनिवार दिनांक 19 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता नगर वाचनालयाच्या पाठक हॉल येथे हा सत्कार समारंभ होणार आहे सर्व सातारकर नागरिकांनी आणि साहित्यप्रेमींनी या सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन नगर वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अजित कुबेर, उपाध्यक्ष अतुल जोशी आणि विश्वस्त समितीचे अध्यक्ष अनंतराव जोशी, कार्यवाह आणि संचालक मंडळ यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!