“सुवर्णभूमी कंबोडिया” या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन


लेखिका ॲड.सीमंतिनी नूलकर स्लाईड शो दाखवणार
सातारा
ॲड. सीमंतिनी नुलकर लिखित “सुवर्णभूमी कंबोडिया” या पुस्तकाचे प्रकाशन, वास्तुसंवर्धनकार अंजली कलमदानी, डॉ सुधिंद्र सरनोबत, शिरीष चिटणीस, . डॉ. मेधा क्षीरसागर,डॉ.संदीप श्रोत्री, यांच्याहस्ते रविवार दिनांक 13 एप्रिल रोजी होणार आहे.हा कार्यक्रम ब्लॅक पर्ल हॉल ग्रीन फील्ड सदर बाजार सातारा येथे सायंकाळी पावणेपाच वाजता आयोजित केलेला आहे. या वेळी लेखिका ॲड.सीमंतिनी नूलकर “सुवर्णभूमी कंबोडिया” हा स्लाईड शो दाखवणार आहेत.
“सुवर्णभूमी कंबोडिया” हे पुस्तक केवळ प्रवासवर्णन नाही.कंबोडियामधील अंगकोरवाट, बायोन, ता प्रोम्ह सारखी भारतीय स्थापत्यकलेचा प्रभाव असलेली प्राचीन मंदिरे,अप्रतिम शिल्पपट, कंबोडियातील संस्कृतीचे तरल पदर,अप्सरानृत्य, कमळकला,साहित्य,निसर्ग,खाद्यसंस्कृती, अजब वर्तनशैली असलेली मेकाँग नदी, तरंगती गावे, कंबोडियाला युद्धाचे आजही भोगावे लागत असलेले परिणाम,तिथला भीषण नरसंहार यांचा लेखाजोखा या पुस्तकात मांडलेला आहे.
यापूर्वी ॲड. सीमंतिनी नूलकर यांची लदाख-भारताचा अद्भुत मुकुटमणी, बिरिस्ता , अकथ कथा, आणि दोन कायदेविषयक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
सर्व पुस्तकप्रेमीना या कार्यक्रमासाठी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!