बीबीए, बीसीए केंद्रीय प्रवेश नोंदणी अंतीम तारीख १६ जुलै
केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवेश कक्षात मोफत फॅसिलीटी केंद्र
सातारा
महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवलेल्या बी.बी.ए.आणि बी.सी.ए. या व्यावसायिक पदवी प्रवेशासाठी कागदपत्राची नोंद व पडताळणी करण्याची प्रक्रिया दि. ६ जुलै ते१६ जुलै २०२६ या कालावधीत शासनाने ठरवून दिलेल्या सुविधा केंद्रावर होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी शासनाने आयोजीत केलेली सीईटी दिलेली आहे अशा पात्र विद्यार्थ्यांनी कागदपत्रे वेळेत सोबत घेऊन पडताळणी करून केंद्रीय सामुहीक प्रवेश प्रक्रियेमध्ये नोंदणी करावी.
ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली आहे अशाच विद्यार्थ्यांना नोंदणी व कागदपत्र पडताळणीसाठी फॅसिलीटी केंद्राची सोय रयत शिक्षण संस्थेचे वर्ये येथील केबीपी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट प्रवेश कक्षात मोफत करण्यात आली असल्याचे संचालक डॉ.बी.एस. सावंत यांनी सांगितले.
तसेच जे विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत परंतु काही कारणाने शासनाशी आयोजीत केलेली प्रवेश परिक्षा सीईटी दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील बॅच्यूलर ऑफ काॅंप्यूटर सायन्स(बीसीएस) या चार वर्षे कालावधीच्या जागतिक समकक्ष कॉंप्यूटर सायन्स व इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजी ही पदवी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित व महाराष्ट्र शासन मान्यता पदवी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे इच्छूक विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्यूटमधील प्रवेशकक्षास भेट द्यावी असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी केले आहे.

