शनिवारी अभी न जाओ छोडकर..गीत मैफिल
दीपलक्ष्मी आणि माय बिट्स् स्टुडिओची प्रस्तुती
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आणि माय बिट्स् स्टुडिओ सातारा प्रस्तुत “अभी न जाओ छोडकर ” या अत्यंत गाजलेल्या सदाबहार द्वंद्व गीतांचा कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे .
या मैफिलिस प्रमुख पाहुणे म्हणून सुनील साबळे गुलाब सावंत, मुकुंद फडके, अनिल वाळिंबे, राजेंद्र सप्रे, गजानन दीक्षित, मुकुंद पांडे,
शिरीष चिटणीस मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन मुकुंद पांडे यांचे असून निवेदन ॲड. स्नेहल कुलकर्णी करणार आहेत.सदर गीत मैफिलीमध्ये मुकुंद पांडे
डॉ.लियाकत शेख ,ॲड.लक्ष्मीकांत आघोर, प्रशांत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी ,प्रिया आघोर, मधु गिझरे , विजया चव्हाण गायक कलाकार आपली सुमधुर गीते सादर करणार असून या कार्यक्रमास सचिन शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभली आहे.
या गीत मैफिलीस समस्त सातारकर रसिक श्रोत्यांनी त्यांनी उपस्थित
रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले तसेच माय बिट्स् स्टुडिओ सातारा चे प्रमुख डॉ. लियाकत शेख यांनी केले आहे

