सुरुवात तुम्ही केली,शेवट मी करणारच
रामराजे नाईक निंबाळकरांचा स्टेटसमधून इशारा,
सातारा
विधानपरिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाटसअपला एक स्टेटस ठेवलं आहे त्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी “सुरुवात तुम्ही केली आहे तर शेवट मी करणारच.” असं म्हटलं आहे. . संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची सुरु असलेली आयकर विभागाची कारवाई संपल्यानंतर हे स्टेटस त्यांनी ठेवलं आहे यानिमित्तानं रामराजे नाईक निंबाळकर यांचा अप्रत्यक्षरित्या मंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजित निंबाळकर यांना इशारा दिलाय का असा सवाल उपस्थित आहे.
संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर कुटुंबियांची इनकम टॅक्स डिपार्टमेंटकडून चौकशी करण्यात आली. बुधवारपासून सुरु असलेली कारवाई रविवारी रात्री संपली. यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी हे स्टेटस ठेवले
सध्या तरी रामराजेंनी स्टेटस ठेवत कुणाचं नाव घेतलेलं नाही. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या व्हॉट्सअप स्टेट्स नंतर पुन्हा एकदा जयकुमार गोरे, रणजित निंबाळकर विरुद्ध रामराजे नाईक निंबाळकर वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

