विनोद कुलकर्णी यांचा सोमवारी सत्कार


साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गौरव
सातारा
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचा सत्कार आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सोमवार दिनांक 14 एप्रिल रोजी सायंकाळी सडे पाच वाजता वाजता आयोजित केला आहे.
हा सत्कार ज्येष्ठ लेखक, साहित्यिक व अष्टपैलू व्यक्तिमत्व विनय हर्डीकर तसेच प्रख्यात साहित्यिक आणि विचारवंत प्राचार्य डॉ. सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास डॉ.संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, शिरीष चिटणीस, विनायक भोसले मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची झालेली निवड त्यांच्या असंख्य स्नेही मंडळींना समाधान देणारी असून अभिमान वाटावा अशी आहे.साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या विनोद कुलकर्णी यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. आता साहित्य मंडळासाठी ते हीच महत्वाची जबाबदारी सांभाळतील.
सार्वजनिक जीवनात स्वतःची ओळख निर्माण करणे आव्हानात्मक असते. ते आव्हान विनोद कुलकर्णी यांनी यशस्वीपणे पेलून दाखविले. आज मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त आहे. यासाठी ज्यांनी अतिशय परिश्रम घेतले त्यात विनोद कुलकर्णी अग्रभागी आहेत. त्यांच्याच पुढाकारातून मराठीसाठी राजधानीत पंतप्रधान मोदी यांना एक लाख पत्रे पाठवली गेली. केवळ पत्र पाठवून ते थांबले नाहीत. आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारख्या दिग्गज नेत्याबरोबर त्यांनी दिल्लीत धडक दिली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्यामध्ये या धडपडीचाही समावेश आहे.महाराष्ट्राला हे फळ मिळाले, मराठीवर अभिजाततेचे शिक्कामोर्तब झाले.
रचनात्मक कार्य, ते कार्य प्रभावी होण्यासाठी खंबीर कृती, प्रभावी संवाद कौशल्य, अशी विनोद कुलकर्णी यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मराठी भाषा, मराठी साहित्य यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी साताऱ्यात उभ्या राहिलेल्या मराठी भाषेच्या चळवळीची धुरा विनोद कुलकर्णी यांनी समर्थपणे सांभाळली आहे.९९,१०० आणि १०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नियोजन आणि नेतृत्व कारण्याची जबाबदारी आता महाराष्ट्र साहित्य परिषद ,पुणे यांचेकडे महामंडळ ३ वर्षेसाठी आल्यामुळे आली आहे.ऐतिहासिक ही तिन्ही संमेलने होऊन जगभरातील मराठी भाषिकांना वेगळी दिशा देऊन मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी याचा खचितच उपयोग होईल.
या सत्कार समारंभ कार्यक्रमास समस्त सातारकरांनी यावे असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले तसेच आम्ही पुस्तक प्रेमीचे प्रमुख डॉ. संदीप श्रोत्री यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!