हिंदी-मराठी गाण्यांचा शुक्रवारी बहारदार कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था आयोजित सरगम प्रस्तुत ” गाणी मनातली”
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सातारा आयोजित सरगम प्रस्तुत गाणी मनातली हा हिंदी-मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केला आहे .या मैफिलिस प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रमणलाल शहा ,सुरेश चिंचकर ,अनिल वीर विकास धुळेकर , शिरीष चिटणीस हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हेमंत शिंदे, संजय गोडसे, लक्ष्मण खामकर , गजानन नलवडे,सतीश पाटील , मेघा पंडित, संगीता पोतेकर हे गायक कलाकार आपली कर्णमधुर गीते सादर करणार असून या कार्यक्रमाचे निवेदन सचिन माने करणार आहेत.
या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले तसेच सरगम ग्रुपचे प्रमुख हेमंत शिंदे यांनी केले आहे

