बुधवारी साताऱ्यात गझल गायनाचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुरिली श्यामतर्फे आयोजन सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुरिली श्याम यांच्या संयुक्त विद्यामाने गझल कोणते
कॉन्सर्ट म्हणजेच गझल गायनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे यावेळी कैलास मोहिते व ममता नरहरी हे गायक कलाकार विविध गझल सादर करणार आहेत ,.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय शिंदे,शैलेश ढवळीकर, मुकुंद फडके, शिरिष चिटणीस उपस्थित राहणार आहे
गझल हा गायन प्रकार सर्वांच्या आवडीचा असून गझल अर्थपूर्ण आणि श्रवणीय असतात.चित्रपट सृष्टीमध्ये अनेक गीतकारांनी चांगल्या गझल लिहील्या असून संगीतकारांनी त्याला चांगला स्वर साज चढवला आहे .अशा अनेक उत्कृष्ट गझलचे सादरीकरण या कार्यक्रमात होणार असल्याने रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

