योगविद्या धाम सातारा संस्थेअंतर्गत योगशास्त्र अभ्यासक्रम
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया सुरू.
सातारा
योगविद्या धाम सातारा संस्थेअंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे एम ए योगशास्त्र हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि योगशिक्षक हा पदविका अभ्यासक्रमांची ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
योगशिक्षक हा पदविका अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम असून प्रवेशासाठी वय वर्षे अठरा पूर्ण आणि बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तसेच एम ए योगशास्त्र हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम असून या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. वयाची अट नाही.
तसेच एम ए योगशास्त्र या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे
वरील दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करता येईल.
अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा, कागदपत्रे आणि अन्य माहितीसाठी सविता कारंजकर ९९२२८१४१८३
आणि कोमल वाघमारे ७७३८४३१०१२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्या शैलजा ठोके यांनी केले आहे

