डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची ८८ वी पुण्यतिथी


कथाभारती व केतकर कुलसभेतर्फे आदरांजली
पुणे
मराठीतील प्रथम ज्ञानकोश निर्माण करणा-या डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची ८८ वी पुण्यतिथी महाराष्ट्र साहित्य परिषद, कथाभारती व केतकर कुलसभेतर्फे साजरी करण्यात आली. “कठीण परिस्थितीवर मात करून अमेरिकन डॉक्टरेट पदवी डॉक्टर केतकर यांनी प्राप्त केली त्यानंतर देश प्रेमाखातर ते मायदेशी परतले व मराठीतील पहिला ज्ञानकोश पंधरा वर्षाच्या अथक प्रयत्नांनी निर्माण केला.श्रम, ज्ञानलालसा, देशभक्ती हे गुरु आपण डॉ. केतकरांचे स्मरण करताना जोपासले पाहिजेत ” असे उद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी काढले.
प्रास्ताविकात प्राचार्य श्याम भुरके म्हणाले मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी मूलभूत संशोधन करणा-यांमध्ये डॉ. केतकर होते. त्यानी मराठीला ज्ञानभाषाही बनविले.
यावेळी माधुरी सहस्त्रबुद्धे माजी नगरसेविका, श्याम सातपुते माजी नगरसेवक, ॲड. असिम सरोदे ,माधव राजगुरू,उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, संजय केतकर आदी मान्यवर उपस्थित होते. केतकर कुल सभा, कमला नेहरू उद्यानमित्रमंडळ यांचे सदस्य उपस्थित होते .प्राचार्य शाम भुर्के रचित केतकर गीताचे सामूहिक गायन केले.
आभार प्रदर्शन करताना मसापचे कार्यवाह शिरीष चिटणीस म्हणाले,१९२६ साली नि:शस्त्रांचे राजकारण हे लेखक श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे पुस्तक त्यांनी त्यांच्या उत्पादक स्वयंनिर्णयी संघातर्फे प्रकाशित केले.त्यात ते म्हणतात हिंदुस्थानला स्वराज्य प्राप्त करून देणे हेच पुढच्या आयुष्यातील अनेक वर्षाचे कार्य ठेवावे असा माझा हेतू आहे.मला ज्ञानकोशाचे काम पूर्ण झाल्यावर याकडे लक्ष्य देता येईल.केतकरांचे विचार व कार्य आजही प्रेरणादायी आहेत.त्यांच्या साहित्याचा प्रचार यापुढे सातत्याने आपण करूया


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!