ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील गाण्यांनी रसिक मंत्रमुग्ध
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि सुरमयी शाम यांचा उपक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी पतसंस्था आणि सुरमयी शाम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कराओके कार्यक्रमात 1950 ते 1970 अशा कालखंडातील ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील हिट गिते सादर करण्यात आली. हेमंत कुमार यांनी गायलेली तुम पुकारलो असेल किंवा है अपना दिल तो आवरा हे श्वेता जाधव आणि उर्मिला शर्मा यांनी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन टाकलं. बाबूजी धीरे चलना हे गित गीतांजली पाटील आणि उर्मिला शर्मा यांनी खुपच छान गायलं. तसेच मन्नाडे यांचे ये रात भिगीभिगी असेल किंवा रफी साहेबांनी आणि लता दीदींनी गायलेलं धीरे धीरे चल हे या गाण्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. आज पिया तोहे हे शून्यात घेऊन जाणार गित गीतांजली पाटील यांनी सोलो गायलं, तसेच पान खायो सैया हमारो हे मस्ती असणारे गित उर्मिला शर्मा यांनी उत्तम रीतीने सादर केले.मुकेश यांनी गायलेली आणि स्वर्गीय मनोज कुमार यांना श्रद्धांजली म्हणून कोई जब तुम्हारा हृदय तोड दे हे ठेहेराव असलेलं आणि विचार करायला लावणार गित कैलास मोहिते यांनी अप्रतिम गायलं. या कार्यक्रमाची सांगता छोडो कल की बाते या देश भक्तीपर गाण्यानी करण्यात आली. कार्यक्रमासाठी गीतांजली पाटील, श्वेता जाधव, उर्मिला शर्मा आणि कैलास मोहिते यांनी ही गाणी सादर केली. गायकांनी त्या जमान्यातील आठवणींना उजाळा दिला. ध्वनी संयोजक कैलास मोहिते यांच होतं प्रमुख पाहुणे ऍडव्होकेट सीमंन्तीनी नुलकर, वासंती घाडगे, स्नेहा टाकेकर, लियाकत शेख, कैलास मोहिते, शिरीष चिटणीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.ऍडव्होकेट नुलकर थीमचे कौतुक करतांना म्हणाल्या की त्या काळातील गाणी अर्थपूर्ण होती.त्याच ताकदीचे संगीतकार आणि गायक होते त्यामुळे ती गाणी आजही आपल्याला ऐकावीशी वाटतात. ब्लॅक अँड व्हाईट ईरा म्हणण्यापेक्षा तो गोल्डन ईरा असं म्हणावं लागेल. त्या नंतर वासंती घाडगे यांनी मनोगत व्यक्त करतांना मला माझ्या त्या काळात घेऊन गेलात ह्या भावना व्यक्त केल्या. स्नेहा टाकेकर यांनी त्यांच मनोगत व्यक्त करतांना स्वानंदासाठी गाणं हा अनुभव इथं आला असे सांगितले .विशेषत: श्वेता जाधव ज्या पद्धतीने आनंद घेऊन गात होत्या आणि देत होत्या हे जाणवत होतं. की या वयामध्ये आपल्या आनंदासाठी गाणं म्हणणं गरजेचे आहे. शिरीष चिटणीस यांनी गायलेल्या गाण्यांच विशेष कौतुक त्यांनी केलं.

