पूर्वीचे ठाकरे सरकार कमिशनखोर


महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत नरेंद्र मोदींचा हल्ला

Advertisement

चंद्रपूर :
लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडला आहे. चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंच्या महाविकासआघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. चंद्रपूरमधून राम मंदिरासाठी लाकडं पाठवण्यात आलं होतं. चंद्रपूरमधून नव्या लोकसभेसाठीही लाकडं आली होती, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
‘महाराष्ट्रात कोणताही प्रकल्प आला तर कमिशन द्या नाहीतर काम थांबवतो, असंच काम केलं आहे. या महाविकास आघाडीने जलयुक्त शिवार योजना थांबवली. समृद्धी महामार्गाला सुद्धा विरोधकांनी विरोध केला होता. मुंबईत मेट्रोचं काम थांबवलं होतं. पीएम आवास योजनेतून पैसे येऊन सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही. असा आरोप मोदींनी केला.
‘इंडी आघाडीने नेहमी देशाला अस्थिरतेमध्ये ढकललं आहे. एक स्थिर सरकार का असावं हे महाराष्ट्रापेक्षा जास्त कुणी सांगू शकत नाही. इंडिया आघाडी सरकार जेव्हा जेव्हा आलां तेव्हा महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे. जेव्हा इंडिया आघाडीचे लोक षडयंत्र करून सरकारं आणली पण त्यांनी स्वत: चाच विकास केला, घराण्याचा विकास केला. कंत्राट कुणाला मिळालं पाहिजे, कसं मिळालं पाहिजे, यासाठी त्यांनी काम केलं’, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!