आगामी टी-20 वर्ल्डकप भारत आणि श्रीलंकेत


नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला. भारताने विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. हा ९ वा टी-20 विश्वचषक होता.पुढचा T20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. आयसीसीने २०२६ च्या टी-20 विश्वचषकासाठी फेब्रुवारी ते मार्चची विंडो दिली आहे. या विश्वचषकातही एकूण २० संघ सहभागी होणार आहेत.
पुढील विश्वचषक म्हणजेच २०२६ चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाईल. दोन्ही देश संयुक्तपणे याचे आयोजन करणार आहेत. २०२४ टी-20 विश्वचषकातील सुपर-८ संघ २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.यजमान असल्यामुळे भारत आणि श्रीलंका वर्ल्डकपचा भाग असतील. २०२६ टी-२० विश्वचषकातील बहुतांश सामने भारतात खेळवले जातील. या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा संघही भारतात येणार आहे. २० संघांमध्ये एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

Advertisement

टी-20 विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले देश
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!