प्रा डॉ प्रेरणा उबाळे यांचा बुधवारी सत्कार
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे प्रा डॉक्टर प्रेरणा उबाळे यांचा सत्कार बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता पुणे येथील पत्रकार भवन सभागृहात होणार आहे प्रा डॉक्टर प्रेरणा उबाळे यांनी कवी वसंत आबाजी डहाके यांच्या शुनःशेप या मराठी काव्यसंग्रहाच्या हिंदी भाषांतरासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई यांच्यातर्फे त्यांना मामा वरेरकर कास्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते त्याबद्दल त्यांचा सत्कार ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व भाषांतरकार प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते तसेच जेष्ठ हिंदी साहित्यिक व भाषांतरकार दामोदर दामोदर खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रख्यात हिंदी साहित्यिक सुनील देवधर व दैनिक केसरीचे सहसंपादक रामदास नेहुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले आहे

