अष्टगंधार मालिकेच्या दुसऱ्या भागात मोहम्मद रफी
रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुपच्या कलाकारांचे सादरीकरण
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” आठ गायकांची खास मालिका मधील भाग दुसरा भाग दीपलक्ष्मी सांस्कृतीक हॉलमध्ये आयोजित केला गेला. हा कार्यक्रम मोहम्मद रफी यांच्या गाण्यांवर आधारित होता. तसेच रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे राजु जाधव यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. आशुतोष वाळिंबे, ॲड. रेशमा वाळिंबे, सुनील साबळे , दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस,प्राचार्य राजेंद्र शेजवळ,सौ सुरेखा शेजवळ,वनराज कुमकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांनी केले . राजू जाधव यांचे सोबत रॉयलचे इतर गायकांनी त्यांना साथ सांगत दिली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी आपली गायन कला सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
ह्यावेळी बोलताना श्री. व सौ. वाळिंबे यांनी अष्टगंधार ह्या मालिकेचे कौतुक केले व खूप छान संकल्पना असल्याचे सांगितले. दीपलक्ष्मीचे सर्वेसर्वा शिरीष चिटणीस यांनी देखील आपल्या शैलीमध्ये रॉयलच्या कलाकारांचे कौतुक केले.