डॉ. मुरहरी केळे यांची प्रकट मुलाखत


दुबई येथे होणार पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन

Advertisement

छत्रपती संभाजीनगर
मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे आयोजित दिनांक 0४ डिसेंबर २०२४ ते ११ डिसेंबर २०२४ दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. सदर साहित्य संमेलनात त्रिपुरा राज्य विद्युत मंडळाचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे माजी संचालक डॉ.मुरहरी केळे यांची पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनात प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे, असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ.महेश खरात यांनी जाहीर केले.
डॉ.मुरहरी केळे यांनी अहिल्यादेवी होळकर आणि संतवाणी या दोन ग्रंथाचे संपादन केले असून त्यांनी ‘जगी ऐसा बाप व्हावा’, ‘नानी ” हे अनुक्रमे वडील आणि आई यांचे जीवनावर आधारित चरित्रग्रंथ आणि ‘ एडका’ हे आत्मकथन लिहिले आहे. याशिवाय स्फुट लेखांचे ‘शब्द शिल्प’ हे पुस्तकही त्यांचे नावावर आहे. डॉ.केळे यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये अनेक लेख लिहिले असून त्यांनी २० पेक्षा जास्त शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पातळीवर सादर केलेले आहेत, त्यात अमेरिकेतील हॉर्वर्ड युनि्हर्सिटीचाही समावेश आहे. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एम जी एम विद्यापीठ आणि एम आय टी विद्यापीठाच्या अभ्यासमंडळावर काम केले असून त्यांची ‘ जगी ऐसा बाप व्हावा ‘ ही साहित्य कलाकृती डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमास समावेश आहे. त्याचबरोबर त्यांचे पॉवर डिस्ट्रीब्यूशन फ्रेंचायशी या विषयातील पीएच. डी. असून त्यांच्या संशोधनावर आधारित दोन इंग्रजी ग्रंथ केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने प्रकाशित केले आहेत. नुकताच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विषयातील आचार्य पदवीसाठी ‘मराठी साहित्यातील विजेचे चित्रण : एक अभ्यास’ या विषयावर पीएच.डीचा प्रबंध डॉ.महेश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच सादर केला आहे. त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात यावी असे मुक्त सृजन साहित्य पत्रिकेच्या बैठकीत ठरले. त्यांची प्रकट मुलाखत डॉ. रामकृष्ण दहिफळे व डॉ. निर्मोही फडके या घेणार आहेत . सदर बैठकीला डॉ. संतोष देशमुख,प्राचार्य डॉ. रामकिशन दहिफळे, प्रिया धारूरकर, डॉ. निलेश देगावकर, हनुमंत सोनवणे, डॉ.संभाजी पाटील, डॉ. किसन माने आदी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!