‘वळणावरची माणसं’ पुस्तकाचे अभिवाचन
शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी रहिमतपूरमध्ये कार्यक्रम
रहिमतपूर
वाचन संस्कृती वाढीस लागावी, नव्या जुन्या साहित्यकृतीचा परिचय वाचकांना व्हावा या उदात्त हेतूने येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने रहिमतपूर येथे शुक्रवार दि. ४ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३:०० वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या ‘वळणावरची माणसं’ या पुस्तकाचा अभिवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती प्राचार्या डॉ. भाग्यश्री जाधव, मराठी विभागप्रमुख प्रा. आबासाहेब वैराट यांनी दिली.
परिस्थितीशरण माणसांच्या स्वभावाच्या, नात्यांच्या गुंतागुंतीचा वेध घेणाऱ्या व्यक्तीचित्रांच्या अभिवाचनाचा हा आगळावेळा प्रयोग असणार आहे प्रमुख अतिथी व सादरकर्ते म्हणून लेखक डॉ. राजेंद्र माने, सौ. वैदही कुलकर्णी, श्री चंद्रकांत कांबिरे, डॉ. अदिती काळमेख उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम या भूषविणार आहेत. पंचक्रोशी शिक्षण मंडळ, ‘चैत्रबन’ परिसर रहिमतपूर येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन प्राध्यापक,विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच रहिमतपूर व परिसरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. युवराज खरात, प्रा. श्रीकांत बोधे यांनी केले आहे.