डॉक्टर पेशंट नात्यावर गुरुवारी चर्चा


अश्वमेध ग्रंथालय व भारती फाऊंडेशनतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
सध्या डॉक्टर पेशंट हॉस्पिटल याविषयी काही ना काही घडत असलेल्या बातम्या ऐकायला वाचायला पाहायला मिळतात .अशावेळी सत्य काय असतं हे नेमकं कळत नाही पण तरीसुद्धा डॉक्टर आणि पेशंट यांचं नातं हे खूप महत्त्वाचं आणि विश्वासाचं असायला हवं असं सगळ्यांना वाटतं .जागतिक आरोग्य दिनानिमित्त अश्वमेध ग्रंथालय व भारती फाऊंडेशनतर्फे या सामाजिक विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे ही गुरुवार दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता सोमण सभागृह राजवाडा सातारा येथे होणार आहे या चर्चेत वैद्य सुयोग्य दांडेकर, डॉ राजेंद्र माने,डॉ दिलीप पटवर्धन,डॉ संजीवनी यादव,डॉ अशफाक मुल्ला हे सहभागी होणार असून प्रा,श्रीधर साळुंखे संवादक असणार आहेत
या कार्यक्रमाला सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक रवींद्र भरती,उपाध्यक्ष दि एम मोहिते,कार्यवाह शशिभूषण जाधव यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!