हिट्स आॕफ कुमार सानू कार्यक्रमाला प्रतिसाद


सातारा
दीपलक्ष्मी सांस्कृतिक हाॕल,सातारा येथे दीपलक्ष्मी पतसंस्था आणि “एरा म्युझिकल ग्रुप प्रस्तुत” आयोजित “मेरी आवाज ही पहचान हैं” हा हिट्स आॕफ कुमार सानू यांनी गायलेल्या अविस्मरणीय गितांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन दीपप्रज्वलन करून प्राचार्य रमणलाल शहा,अनिल वाळिंबे,प्रशांत कुलकर्णी,अनिल वीर,जगदीश खंडागळे,शिरीष चिटणीस आणि कलाकारांच्या हस्ते करण्यात आले.
उत्तम पद्धतीने प्रामुख्याने अष्टपैलू गायक प्रविण जांभळे व गेस्ट गायिका-हलिमा दिदी आणि सुजाता दरेकर यांनी विविधता असणारी असंख्य गिते अभुतपुर्व,अवर्णनीय,अत्यंत सुमधुर आवाजात सादर केली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ख्यातनाम निवेदिका/गायिका शामल काकडे यांनी अलंकारिक भाषेत प्रत्येक गितांचे वर्णन करीत खुपचं छान पद्धतीने सादर केले. या कार्यक्रमास संगितप्रेमींची हाऊसफुल्ल उपस्थिती होती. सर्व गाणी अप्रतिम रित्या सादर करुन सर्वांना स्वर्गिय आनंद गायक कलाकारानी दिला. एकंदरीत संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन, कुमार सानूची गाणी,गायन, तसेच आल्हाददायक साऊंड सिस्टीम या सर्व बाबींमुळे कार्यक्रम आनंददायी झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!