बा.सी. मर्ढेकर नवकाव्याचे प्रवर्तक


लोकमंगल हायस्कूल नागेवाडी-कुशी येथे साहित्यिक उपक्रम
सातारा
ज्येष्ठ कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मृतिदिन लोकमंगल हायस्कूल नागेवाडी-कुशी येथे साहित्यिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला‌. याप्रसंगी ‘लोकमंगल ग्रुप’ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांनी बा.सी .मर्ढेकर वैचारिक क्रांती घडवणारे नवकाव्याचे प्रवर्तक कवी होते असे नमूद केले .बा.सी. मर्ढेकरांच्या कविता जर इंग्रजी भाषेमध्ये अनुवादित झाल्या असत्या तर कदाचित त्यांच्या कविता सर्व जगाला परिचित झाल्या असत्या. वास्तविक बा.सी.मर्ढेकर यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते.बा.सी. मर्ढेकर हे एक प्रभावी समीक्षक आणि प्रयोगशील कादंबरीकार होते.बा.सी.मर्ढेकर यांचे साहित्य नोबेल पुरस्कार मिळण्याइतकेश्रेष्ठ आहे असे ते म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भगवान जाधव यांनी केले.विद्यालयातील विद्यार्थिनींनी बा.सी .मर्ढेकरांच्या कवितेचे गायन याप्रसंगी केले. तसेच विद्यार्थ्यांनी बा.सी.मर्ढेकरांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी आदिती सावंत यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार शशिकांत जमदाडे यांनी केली याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रेय सावंत उपस्थित होते हा कार्यक्रम पार पडण्यासाठी शशिकांत जाधव सौ अर्चना सावंत ,राहुल घोडके दिलीप सावंत आणि रमेश महामुलकर यांनी परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!