अष्टगंधार मालिकेतील दुसरा कार्यक्रम शुक्रवारी
मोहम्मद रफी यांची गाणी होणार सादर
सातारा:
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि रॉयल म्युझिकल इव्हेंट्स ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अष्टगंधार” या आठ गायकांची खास मालिकामधील भाग दुसरा हा दि. ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत दीपलक्ष्मी सांस्कृतीक हॉल मधे आयोजित केला आहे. हा कार्यक्रम मोहम्मद रफी यांच्या गाण्यांवर आधारित आहे. रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे राजु जाधव हे कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. आशुतोष वाळिंबे, ॲड. रेशमा वाळिंबे, सुनील साबळे , गुलाब सावंत, दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना रॉयल म्युझिकल इव्हेंट्सचे प्रमोद लोंढे यांची आहे व निवेदन सौ राधिका काळे यांचे आहे. राजू जाधव यांचेसोबत रॉयलचे इतर गायक त्यांना साथ सांगत देणार आहेत.
ह्या कार्यक्रमास सर्व रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गायक कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन दीपलक्ष्मीचे चेअरमन शिरीष चिटणीस व रॉयल म्युझिकल इवेंट्स ग्रुप तर्फे करण्यात येत आहे.

