गुरूवारी साताऱ्यात देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम


दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला दिनांक १४ ऑगस्ट रोजी दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये जास्वंद प्रस्तुत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. गाथा बलिदानाची या उपक्रमांतर्गत जन गण मन ते वंदे मातरम अशा अनेक देशभक्तीपर गाण्यांचा आढावा या कार्यक्रमामध्ये घेण्यात येणार आहे
दीपलक्ष्मी नागरी सहकारी संस्थेने या कार्यक्रमाचे प्रायोजन केले असून सौ धनश्री बागडे ,सुधीर मुळे आणि संतोष वाघ हे कलाकार गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन देशपांडे,युनुस शेख,शबनम मुजावर, मुकुंद फडके आणि शिरिष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. दीपलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरिष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!