साताऱ्यात रविवारी प्रतिभा गौरव साहित्य संमेलन


दिवसभर विविध कार्यक्रमांची मेजवानी

सातारा

Advertisement

येथील अश्वमेध ग्रंथालय व सातारा नगर वाचनालयाच्यावतीने श्रीमंत छत्रपती प्रतापसिंग महाराज थोरले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी समर्थ मंदिर चौकातील दैवज्ञ सांस्कृतिक हॉलमध्ये एक दिवसीय प्रतिभा गौरव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती स्वागत समिती अध्यक्ष प्राध्यापक श्रीधर साळुंखे कार्यवाह वैदेही कुलकर्णी यांनी दिली
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा व बा बोधे, उद्घाटकपदी ज्योतिषाचार्य प्राध्यापक रमणलाल शहा, स्वागताध्यक्षपदी विजयकुमार क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे
सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे प्राध्यापक बोधे यांचा अमृत महोत्सवीवर्षानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे दुसऱ्या सत्रात साहित्य संमेलनांकडून मराठी रसिकांच्या अपेक्षा हा परिसंवाद होणार आहे यात राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर अशोक भोईटे , निरंजन फरांदे , अनिल बोधे मुद्रक व प्रकाशाक विशाल देशपांडे सहभागी होणार आहेत तिसऱ्या गप्पागोष्टी या सत्रामध्ये चित्रपट लेखक नितीन दीक्षित अभिनेते मकरंद गोसावी संवाद व पटकथा लेखक विशाल कदम सहभागी होणार असून ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे संवादकाची भूमिका बजावणार आहेत यावेळी मान्यवरांच्या हस्ते नाट्यकलेची पन्नास वर्षे सेवा केल्याबद्दल तुषार भद्रे यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यानंतर निमंत्रितांचे कवी संमेलन गझलकर वसंत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात प्रदीप कांबळे चंद्रकांत कांबळे राहुल निकम एडवोकेट अनिल गोडसे ताराचंद आवळे युवराज खरात आनंद ननावरे अश्विनी कोठावळे विलास वरे राजेंद्र घाडगे कांता भोसले एडवोकेट सरिता व्यवहारे डॉक्टर आदिती काळमेख निलेश महीगावकर प्राध्यापक प्रकाश बोधे सीमा मंगरूळे आदी कवी सहभागी होणार आहेत
शेवटच्या सत्रामध्ये प्रख्यात वक्ते प्राध्यापक नितीन बानगुडे नाटककार दिलीप जगताप यांच्या हस्ते समारोप आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य असून या संमेलनात जास्तीत जास्त साहित्यप्रेमी सहभागी व्हावे असे आवाहन अश्वमेध वाचनालयाचे संस्थापक डॉक्टर रवींद्र भारती झुटिंग अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र माने आणि संचालकांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!