पुण्यात बुधवारी गुणसुमने मी वेचियली या भावे कार्यक्रम


स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा मागोवा

Advertisement

पुणे
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्यावर आधारित गुणसुमने मी वेचियली या भावे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे बुधवार दिनांक 28 मे रोजी सायंकाळी 7 वाजता वीर बाजी पासलकर स्मारक, राजाराम पुलाजवळ, सिंहगड रस्ता, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे जाज्वल्य राष्ट्रभक्ती! सावरकरांच्या संपूर्ण कुटुंबानं एकत्रितपणे सतीचं वाण हाती घेतलं आणि भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी मांडलेल्या यज्ञकुंडात सर्वस्वाच्या आहुती दिल्या.स्वातंत्र्यवीरांचं चरित्र इतकं दिव्य आहे की ते अभ्यासकाची मति गुंगवून टाकतं.
स्वातंत्र्यवीर सावरकर एकाच वेळी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरून सर्वस्वाची होळी करावयास सिद्ध असे शूरवीर योद्धे होते, त्याचवेळी अतिशय तरल मनाने स्वातंत्र्यदेवतेची उपासना करणारे भावुक भक्त होते.सावरकरांनी अफाट साहित्यनिर्मिती केली आणि ती स्वातंत्र्यदेवतेच्या चरणी अर्पण केली. ही समर्पण भावना त्यांच्या प्रत्येक शब्दात, कृतीत आहे, तिचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे होणार आहे
सावरकरांचे समग्र साहित्य अफाट आहे, त्याचा धांडोळा घेऊन त्यातले काही निवडक वेचे, पत्रे, उतारे, कविता, गीते, नाट्यप्रसंग एका सलग संहितेद्वारे सादर केले जाणार आहे सर्वानी सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!