संत साहित्य विषयक ग्रंथांची गुढी
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयात उपक्रम
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा येथे गुढीपाडव्यानिमित्त संत साहित्य विषयक ग्रंथांची गुढी उभारण्यात आली .
नवीन वर्षाचा शुभारंभ होताना संत साहित्याचे विचार माणसाच्या जगण्याला प्रेरक आणि प्रेरणा देणारे ठरतील त्यासाठी ग्रंथांचे वाचन महत्त्वाचे आहे
नगर वाचनालयात विविध प्रकारचे जवळपास दीड लाख ग्रंथ उपलब्ध आहेत .ज्या वाचकाला ज्या पद्धतीचे साहित्य आवडेल ते साहित्य त्याला वाचण्यास उपलब्ध करून दिले जातेमाणसाला समृद्ध आणि सजग बनायचे असेल तर ग्रंथ वाचन हे महत्त्वाचे आहे हे सांगण्याच्या उद्देशातून ही ग्रंथांची गुढी वाचनालयात उभी केली आहे
यावेळी गुढीचे पूजन करण्यात आले कार्यवाह वैदेही कुलकर्णी ,लेखक डॉक्टर राजेंद्र माने,डॉक्टर जोत्स्ना कोल्हटकर, डॉक्टर श्याम बडवे डॉक्टर संदीप श्रोत्री,विजयकुमार क्षीरसागर पत्रकार अनील वीर ,श्रीधर साळुंखे ,गौतम भोसले, आनंदा ननावरे, वसंत चिकोडे , श्री किर्लोस्कर, ग्रंथपाल रुपाली मुळ्ये , अन्वेषा , विष्णू दळवी , भाग्यश्री शिंदे , वेदांत किरवे , विजय दळवी उपस्थित होते .

