युवकांनी सामाजिक संवेदना जागृत ठेवाव्यात – डाॅ डी. टी. शिर्के
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चचा बक्षीस वितरण समारंभ
सातारा
कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्ये येथे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी समाजातील बहुजनांच्या उत्क्रर्षासाठी अनेक शास्त्रज्ञांनी व उद्योजकांनी केलेल्या भरीव कार्याची उदाहरणांसह सविस्तर माहिती देऊन आजच्या तरूणांनी पदवी शिक्षणाबरोबरच उच्च पदव्युत्तर शिक्षण घ्यावे व सामाजिक विकासासाठी संवेदना जागृत ठेऊन काम करावे असे आवाहन बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू प्रा. डॉ डी टी शिर्के यांनी केले.
यावेळी शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीय राज्य विद्यापीठ व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रकाश गवळी उपस्थित होते.
इन्स्टिट्युटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले.कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत डॉ आर डी कुंभार यांनी केले.इन्स्टिट्युटचा वार्षिक कार्यवृंतात आवाहाल डॉ एस आर निकम यांनी सादर केला.
पाहुण्यांची ओळख डॉ एस एस भोला यांनी करून दिली.
बक्षिसांचे वाचन डॉ एस बी चव्हाण, डॉ व्हि डी पाटील व अशोक शिंदे यांनी केले
माजी विद्यार्थी डॉ दिलीप जगदाळे, सतीश जाधव, गौरव कासट, नटवरलाल तपासे, ओंकार यादव, आनंद गेंड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन प्रितीश्री व प्रिंयका लोखंडे यांनी केले.
उपस्थितांचे आभार विद्यार्थी कौन्सिलचे सचिव आदर्श भोसले यांनी मानले

