अरुणकाकांचे प्रेम कलाकारांना प्रेरणा देणारे:सौ.मंजुषा पाटील
विविध मान्यवरांच्या हस्ते अरुण पर्व या पुस्तकाचे प्रकाशन
सातारा
समर्थ सेवा मंडळ ,सज्जनगड आणि अरुण काका गोडबोले यांचे असणारे संबंध व त्यांची सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची हातोटी हीच आम्हा सर्व कलाकारांना प्रेरणा देणारी होती .अरुण काका आज हयात नाहीत हे मन मान्य ही करत नाही .आज इथे गायन करताना मला ते उपस्थित नाहीत हे मनालाही समजवताना खूप दुःख वाटते. तब्बल 34 वर्षे पंडित प्रभाकर कारेकर यांना याच समर्थ सदनमध्ये एकाच दिवशी गायला लावण्याचा हट्टही अरुण काकांचाच होता. आणि तो सातारकरांसाठी व गायन प्रेमींसाठी होता हे दिसून येते.असे उद्गार ज्येष्ठ गायिका विदुषी सौ.मंजुषा पाटील यांनी काढले .
सातारा येथील समर्थ सदन सांस्कृतिक केंद्रात श्री समर्थ सेवा मंडळ व रा.ना.गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट च्या वतीने आयोजित केलेल्या स्वर्गीय अरुण गोडबोले यांच्या ..अरुण पर्व ..या पुस्तकाचे प्रकाशन प्रसंगी पाटील बोलत होत्या.
दरवेळी अरुणकाका मला अभंगांपेक्षा शास्त्रीय गायनही कर असे सांगत असत. त्यांनी अनेक ठिकाणी मला संधी दिली .आणि त्यामुळेच मला आज पुन्हा इथे माझी गायन सेवा देण्याची संधी प्राप्त होत आहे .गोडबोले ट्रस्टचे मी कौतुक करते आणि मनापासून अभिनंदन करते की स्वर्गीय अरुण काका व मारुती बुवा यांचे या कार्यामागील तळमळ व कष्ट आपण पाहिल्यामुळे आजही अनुभवत आहोत असेही सौ.मंजुषा पाटील म्हणाल्या
अरुण गोडबोले यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी अनेक मान्यवरांनी विविध क्षेत्रातून आपल्या भावनांना शब्दात वाट करून दिली त्यांना वाहिलेली आदरांजली.. म्हणजे अरुण पर्व हे पुस्तक आहे या पुस्तकाची संकल्पना श्रीराम नानल व ज्येष्ठ पत्रकार शरद महाजनी यांची होती .आज हे पुस्तक आपल्यापुढे सादर करताना गोडबोले परिवाराला सातारकरांनी आपले मानले याचाच आनंद वाटतो असे सांगून डॉ.अच्युत गोडबोले यांनी आपले प्रास्ताविक केले .
या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंजुषा पाटील ,अशोक गोडबोले ,डॉ .अच्युत गोडबोले, जेष्ठ पत्रकार शरद महाजनी, श्रीकांत कात्रे ,डॉ संदीप श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रद्युम्न गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमास समर्थ विद्यापीठाचे कुलपती व ज्येष्ठ समर्थ भक्त रमेशबुवा शेंबेकर रामदासी, विश्वस्त प्रवीण कुलकर्णी गुरुजी ,अशोक गोडबोले ,श्रीराम नानल,डाॅ.संदीप श्रोत्री, रवींद्र झूटिंग भारती ,डॉ.दिलीप पटवर्धन, गौतम भोसले,गजानन बोबडे, श्रीधर साळुंखे ,संतोष वाघ ,समर्थ सदन व्यवस्थापक राजू कुलकर्णी ,देसाई वहिनी, कल्पना ताडे,सौ. मीना सुपनेकर,गोडबोले परिवारातील सर्व सदस्य यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी
.समर्थ सदन सातारा येथे अरुण पर्व या पुस्तकाचे प्रकाशन करताना सौ. मंजुषा पाटील जेष्ठ पत्रकार शरद महाजनी, श्रीकांत कात्रे ,डॉ संदीप श्रोत्री श्रीराम नानल,अशोक गोडबोले डॉ.अच्युत गोडबोले व मान्यवर .

