ज्ञानविकास मंडळातर्फे आदर्श माता सत्कार


गुरुवार दि. ११ एप्रिल रोजी महिला मंडळ येथे कार्यक्रम

Advertisement

सातारा
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील ज्ञानविकास मंडळाचे वतीने आदर्श माता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे मंडळाचे हे ३५ वे वर्ष आहे. आजपर्यंत ज्ञानविकास मंडळाने सुमारे १६० मातांना आदर्श माता म्हणून गौरवले आहे. हा कार्यक्रम गुरुवार दि. ११ एप्रिल २०२४ रोजी महिला मंडळ सभागृह, गांधी मैदान, राजवाडा, सातारा येथे संध्याकाळी ५.३० वाजता संपन्न होईल.
यावर्षी सातारा जिल्ह्यातील ज्या ४ आदर्श मातांचा सत्कार होणार आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे १) श्रीमती सुलोचना भास्करराव खुटाळे, सातारा २) सौ. रंजना मोहन भिसे मु. पो. दालवडी, ता. फलटण, जिल्हा सातारा ३) श्रीमती सुनिता रविंद्र नावडीकर मु.पो. कऱ्हाड, जिल्हा सातारा ४) श्रीमती सुशिला नामदेव भोसले मु.पो. शिरंबे ता. कोरेगाव जिल्हा सातारा
या ४ आदर्श मातांच्या सत्कार सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष , ज्ञानविकास मंडळ यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!