शनिवारी साताऱ्यात मराठी, हिंदी गीतांचा कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुरसंगीत ग्रुपतर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरसंगीत ग्रुप सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे मराठी हिंदी गीतांचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.किशोर शिंदे यांच्या सुरसंगीत ग्रुपने हा कार्यक्रम प्रस्तुत केला असून कार्यक्रमाचे निर्माता, आयोजक व गायक किशोर शिंदे आहेत सहनिर्माता व गायक उमेश भोसले आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर देवानंद सोनटक्के,मुकुंद फडके,चंद्रकांत देवरुखकर, विजय साबळे,अरुण कुलकर्णी, लक्ष्मीकांत अघोर,शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी पुणे येथील स्मिता गायकवाड, सुवर्णा माने, वैष्णवी आल्हाट आणि सातारचे सागर जावळीकर सुशांत तुपे, सुधा पटवर्धन, अश्विनी कांबळे ,रागिणी शिकलगार, अलिषा शिकलगार हे कलाकार मराठी हिंदी गाणी सादर करणार आहेत
या कार्यक्रमाचे निवेदन पुणे येथील विनय वैद्य करणार आहेत
सर्वांनी या गाण्यांच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन किशोर शिंदे, उमेश भोसले आणि शिरीष चिटणीस यांनी केले आहे

