एकनाथ षष्ठीनिमित्त सांघिक अभंग गायन स्पर्धा
सातारा नगरवाचनालयाचा उपक्रम
सातारा
श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले)नगरवाचनालय ,सातारा यांचे वतीने संतश्रेष्ठ एकनाथ षष्ठी निमित्त सांघिक अभंग गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे
ही स्पर्धा गुरुवार दिनांक २० मार्च २०२५ रोजी दुपारी साडेतीन वाजता पाठक हॉल,नगर वाचनालय येथे होईल. प्रवेश शुल्क रु .५०/- प्रति संघ.असून स्पर्धा स्त्रीया व पुरुष सर्वांसाठी खुली आहे.एका संघात पाच गायक/गायिका व तबला आणि हार्मोनियम साथीदार असे एकूण जास्तीत जास्त सात सदस्य असतील. स्पर्धकांनी केवळ संत रचनाच सादर करावयाच्या आहेत. जी रचना सादर करणार आहात त्याची एक प्रत सादरीकरणापूर्वी परीक्षकांना द्यावी.भक्तीगीत चालणार नाही.
सादरीकरण कालावधी : ५ ते ६ मिनिटे असून साथीसाठी टाळ ,तबला व पेटी आवश्यक साथीदारांची व्यवस्था आपापली करायची आहे.
नांव नोंदणीचा अंतिम दिनांक १६ मार्च २०२५ असून पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धेनंतर लगेचच होईल.
तरी जास्तीत जास्त संघानी आपला सहभाग ग्रंथपाल नगरवाचनालय यांचेकडे नोंदवावा,असे आवाहन नगर वाचनालयाच्या वतीने करणेत येत आहे.

