मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही
एकनाथ शिंदे यांचे मोठं विधान
मुंबई
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही असे म्हटले आहे
रविवारी आजतकला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही तर महायुतीचं सरकार मुख्यमंत्री कोण असेल ते ठरवणार आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा मुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट सांगितलंय. विधानसभा निवडणुकीनंतरच याबाबत महायुतीतील मित्रपक्ष निर्णय घेतील असं शाहांनी म्हटलं होतं
महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी मी शर्यतीत नाही असं सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मी उद्धव ठाकरे नाही. मी एकनाथ शिंदे आहे. महाविकास आघाडीत ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत फेऱ्या मारत आहेत. मी हा विचार नाही करत की मला काय मिळेल, माझं प्राधान्य राज्यात महायुतीचं सरकार बनवणं हे आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. तिन्ही पक्षाचे नेते आणि दिल्लीतील वरिष्ठ एकत्र बसून यासंदर्भात चर्चा करतील आणि कोण मुख्यमंत्री होणार ते ठरेल.अजित पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले होते की, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीय. महायुतीचं सरकार राज्यात पुन्हा आणणं हेच माझं प्राधान्य आहे

