पुरस्कार म्हणजे प्रेरणा देणारा उर्जास्त्रोत:प्रा श्रीधर साळुंखे


ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय साहित्य पुरस्कारांचे वितरण
सातारा
पुरस्कार म्हणजे प्रेरणा देणारा उर्जास्त्रोत असतो ग्रंथ, ग्रंथालय, ग्रंथकर्ता ग्रंथवाचक आणि ग्रंथालय कर्मचारी या संपूर्ण प्रक्रियेला गतीमान करण्याचे काम अशा उपक्रमातून होत असते असे प्रतिपादन प्रा श्रीधर साळुंखे यांनी केले
ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय सातारा मार्फत राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होतेत्यांच्याच हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले .साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने अध्यक्षस्थानी होते मंचावर वाचनालयाच्या अध्यक्ष डॉक्टर सुनीता उत्तेकर उपाध्यक्ष प्राचार्य प्रमोदिनी मंडपे कार्यवाह सुनीता कदम संचालक डॉक्टर अनिमिष चव्हाण उपस्थित होते.
ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार सौ राजश्री शहा सातारा यांनी अनुवाद केलेल्या व्हाईट टॉर्चर या ग्रंथास तर सौ सुमन शिवाजीराव चव्हाण उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार कवी अमोल अहेर शिव पुणे यांच्या अंतरीचा कॅनव्हास या कवितासंग्रहास प्रदान करण्यात आला त्याचवेळी मोहन काळे मुंबई यांच्या एकदा आपणच व्हावे मोर आणि सौ भारती धनवे मंगळवेढा यांच्या दर्शन मात्रे या ग्रंथास उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले
याच कार्यक्रमात साताऱ्यात शहरातील शुभांगी दळवी एडवोकेट संगीता केंजळे डॉक्टर आदिती काळमेख आणि आनंदा ननावरे या साहित्यिकांना प्रेरणा पुरस्कारांनी गौरवाकिंत करण्यात आले .
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक साळुंखे म्हणाले,ग्रंथमित्र डॉ.शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार म्हणजे साहित्य शारदेचा दरबार असून आपल्या अक्षर सृजनाने शोभायमान करणारांचा सन्मान सोहळा आहे पुरस्कार म्हणजे थांबा नसतो तर प्रेरणा प्रदान करणारा ऊर्जा स्रोत असतो. सर्वच लिहित्या हातांना शुभेच्छा आणि ग्रंथालयाच्या संचालक मंडळाचे हृदया पासून कौतुक .
यावेळी डॉक्टर राजेंद्र माने म्हणाले समाजातला भोवताल साहित्यात सजगपणे प्रतिबिंबित करणे हे साहित्यिकाचे कर्तव्य असते .साहित्यिकांनी लोकधर्म पाळून माणसा माणसा मधला संवाद व नाते जिवंत ठेवायला पाहिजे . साहित्य हे माणूस जोडण्यासाठी असते .
या पुरस्कारांचे परीक्षक म्हणून डॉक्टर वैशाली चव्हाण व नंदा जाधव आणि डॉक्टर नीला उत्तेकर यांनी कार्य केले .डॉक्टर वैशाली चव्हाण आणि डॉक्टरनीला उत्तेकर यांनी त्या मागची भूमिका त्यांच्या मनोगतामध्ये स्पष्ट केली .
कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रंथालयाच्या उपाध्यक्ष प्राचार्य प्रमोदिनी मंडपे यांनी केले.
या कार्यक्रमास शिरीष चिटणीस,रवींद्र भारती झूटिंग,डॉक्टर मोहन सुकटणकर,गौतम भोसले,प्राचार्य वि ना लांडगे ,नंदा जाधव,संगीता गुरव,अश्विनी कोठावळे,प्रल्हाद पार्टे,प्रकाश बडदरे वगैरे मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नीला उत्तेकर यांनी केले .
कार्यवाह सुनीता कदम यांनी सर्वांचे आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!