रेपो रेटमध्ये बदल नाही


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कोट्यवधी नागरिकांना दिलासा
मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी नागरिकांना दिलासा दिला असून व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत आरबीआयने नव्या आर्थिक वर्षातील पहिले पतधोरण जाहीर केले आहे. ३ एप्रिल ते ५ एप्रिल दरम्यान रिझर्व्ह बँकेची तीन दिवसीय द्वैमासिक आढावा बैठक पार पडली ते निर्णय ५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत प्रमुख व्याजदर म्हणजे रेपो रेटबाबत चर्चा झाली आणि गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले सत्र यंदाही सुरूच राहिले.
यावेळीही आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही, असे आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर जाहीर केले. अशाप्रकारे गेल्या एका वर्षांपासून रेपो रेटमध्ये कोणताही बदल झाला नसून धोरणात्मक व्याजदर ६.५० टक्क्यांवर स्थिर आहेत. रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळे ग्राहकांच्या वैयक्तिक कर्ज, कार लोन किंवा इतर प्रकारच्या कर्जावर परिणाम होणार नाही. आगामी काळात पुढील काही महिन्यांत देशभरामध्ये लोकसभा निवडणुका होणार असून त्याच पार्श्वभूमीवर आरबीआयचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणुकीआधी व्याजदर कमी केले जातील अशी अपेक्षा कर्जदारांना होती, मात्र तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे एकप्रकारे निवडणुकीआधी सर्वसामान्यांना दिलेली भेटच मानली जात आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!