उन्हाळ्यात घ्या टायरची काळजी


बॉम्बसारखं फूट शकतं कारचं टायर
मुंबई :
टायर फुटून गाड्यांचा अपघात होण्याचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे. त्यामुळे कारच्या टायरची काळजी घेणं गरजेचं असतं. कारच्या कोणत्याही टायरमध्ये हवा कमी असल्यास किंवा पंक्चर झाल्यास किंवा त्यात काही त्रुटी असल्यास कार चालवता येत नाही.उन्हाळ्यात वाहनांच्या टायर्सची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं. टायर चांगल्या स्थितीत नसल्यास कारचा टायर फुटू शकतो आणि त्यामुळे जीवघेणा अपघात होऊ शकतो. कारचे टायर फुटून होणारे अपघात प्रचंड धोकादायक असतात. बऱ्याचदा यामुळे कारमधल्या प्रवाशांना जीव गमवावा लागू शकतो.
जेव्हा कारच्या टायरवर हवेचा जास्त दबाव जास्त असतो तेव्हा गाडीचा टायर फुटतो. जेव्हा टायर आतून आकुंचन पावू लागतो आणि त्यात हवा भरणं शक्य नसतं तेव्हादेखील असंच होतं. त्यामुळे टायरमध्ये हवा थांबून राहत नाही. हवेचा दाब इतका असतो, की एक तर ती टायरमधून लीक होऊ लागते किंवा अचानक मोठा आवाज होऊन टायर फुटतो. टायर फुटण्याची इतरही अनेक कारणं असू शकतात.
आपल्या देशात एप्रिल, मे व जून महिन्यात तापमान खूप जास्त असतं. या तीन महिन्यांत उत्तर भारतातल्या अनेक भागांत पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जातो. या अतिउष्णतेमध्ये टायर फुटण्याची परिस्थिती निर्माण होते. वैज्ञानिक कारणं पाहिल्यास तापमान दाबाच्या सारख्या प्रमाणात असतं. जर तापमान वाढलं तर टायरमधली हवा पसरते आणि या हवेमुळे टायरचे रबर कमकुवत होते, ज्यामुळे टायर फुटण्यासारखी भयंकर परिस्थिती उद्भवते.
कारने कोणत्याही प्रवासाला जाणार असाल तर त्याआधी गाडीचे टायर नक्की तपासा. सोबतच गाडीच्या सर्व टायरमध्ये किती हवा आहे, तेही पाहा. टायरमध्ये जरा जास्त किंवा कमी हवेने फारसा फरक पडत नाही. त्याचबरोबर गाडीचा टायर फुगलेला नाही ना याची काळजी घेणं आवश्यक असतं. जर गाडीच्या टायरमध्ये हवा खूप कमी असेल तर लगेच टायरमध्ये हवा भरून घ्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!