अखिल ब्राह्मण महासंघाचे नारीशक्ती सन्मान पुरस्कार जाहीर


महिला दिनाचे निमित्त साधून पाच महिलांचा होणार सन्मान

सातारा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अखिल ब्राह्मण महासंघातर्फे विविध क्षेत्रात गौरवशाली कामगिरी करणाऱ्या महिलांना ब्राह्मण गौरव नारीशक्ती सन्मान पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे
यावेळी विक्रमवीर गिर्यारोहक धैर्या विनोद कुलकर्णी, कायदेशीर सल्लागार ऍड ज्योती दिवाकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर माधवी जोग,सेंद्रिय शेतकरी अनुश्री फडके आणि आर्थिक सल्लागार अनन्या कुलकर्णी या यशस्वी महिलांचा सत्कार यानिमित्ताने केला जाणार आहे

Advertisement


राजवाडा येथील महिला मंडळ हॉलमध्ये रविवार दिनांक 9 मार्च रोजी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ लेखिका ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ उद्योजिका वैशाली भट उपस्थित राहणार आहेत
सर्वांनी या सत्कार सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी उपाध्यक्ष ऍड श्रीराम देव, सचिव भास्कर मेहेंदळे आणि खजिनदार महेश कुलकर्णी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!