मंजिरी कर्वे आलेगावकर यांची गुरुवारी मैफिल
सातारा
स्वरसाधना संगीत विद्यालय सातारा यांच्यातर्फे डॉक्टर श्रीमती साधना जोशी पुण्यस्मृती सभा उपक्रमाअंतर्गत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका विदुषी मंजिरी कर्वे आलेगावकर यांच्या गायनाच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता समर्थ सदन येथे ही मैफिल होणार आहे मंजिरी कर्वे आलेगावकर यांना तबल्यावर अजित किंबहुने साथ करणार असून हार्मोनियम वर गंगाधर शिंदे असणार आहेत रसिकांनी या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे