रेसिंग कार घुसली गर्दीत


7 जणांचा मृत्यू, 23 जण जखमी

Advertisement

कोलंबो :
कार रेसिंगवेळी एक कार ट्रॅकवरून बाजूला गेल्यानं किमान ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २२ जण जखमी झाले आहे. श्रीलंकेतील सेंट्रल हिल्समध्ये रविवारी हा अपघात झाला.पोलिसांनी सांगितले की, सात मृतांमध्ये रेस मार्शल आणि प्रेक्षकांचा समावेश आहे. अपघातात ८ वर्षांच्या एका मुलीचासुद्धा मृत्यू झाला आहे.
एप्रिलच्या मध्यात सुरू होणाऱ्या राष्ट्रीय नववर्षाच्या निमित्त श्रीलंकेच्या लष्कराने फॉक्सहिलसुपर क्रॉस २०२४ रेसचे आयोजन केले होते. ही रेस पाहण्यासाठी एक लाखांहून अधिक लोक उपस्थित होते. श्रीलंकेच्या मध्य हायलँडसमधील शहर दियातलावामध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी लष्कराचे सैनिकसुद्धा प्रशिक्षण घेतात.नव्या वर्षाची सुट्टी साजरी करण्यासाठी श्रीलंकन नागरिक सेंट्रल हिल्समध्ये येतात. इथंच कार रेसिंग आणि घोडेस्वारीच्या स्पर्धांचे आयोजन होते. श्रीलंकेच्या लष्कराने याआधी २०१९ मध्ये फॉक्सहिलचे आयोजन केले होते. त्यानंतर देशात इस्टर हल्ल्यांचे प्रकार घडले. त्यामुळे शर्यतींना ब्रेक लागला होता.श्रीलंकेत पाच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा शर्यतीचे आयोजन केले होते. मात्र यामध्ये एक कार ट्रॅकवरून बाहेर गेल्यानं घडलेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले. अपघातामुळे पुन्हा शर्यत स्थगित केली गेली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!