गुरुवारी ‘झाल्या तिन्ही सांजा’कार्यक्रम


मराठी भाषा दिन विशेष लावणी गीत कार्यक्रम
सातारा
दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त साधून गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी ‘झाल्या तिन्ही सांजा’ हा लावणी गीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये सायंकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काका पाटील, डॉक्टर कामिनी पाटील,अनिल वाळिंबे, शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये मेघा पंडित, अश्विनी कांबळे ,श्वेता जाधव, स्वाती शेडगे, संगीता पोतेकरआणि उर्मिला वर्मा हे गायक कलाकार गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मेघा पंडित व धनश्री ग्रामोपाध्ये करणार आहेत.
या कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था स्वाती शेडगे सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ सातारकर रसिकांनी घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक विनायक भोसले यांनी केले आहे
लावणी गाणे हे मन उल्हसित करते.मराठी माणसासाठी लावणी गीत हा प्रकार मराठी साहित्यातील कवितेइतकाच लोकप्रिय आहे मराठी भाषा समृद्ध करण्यमाध्ये लावणी गीताचे योगदान महत्वाचे आहे लावणी गीत गायला अवघड़ पण लावणी गीत सादर केल्यानंतर प्रचंड समाधान सर्वानाच मिळते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!