सांगोल्यात भरधाव ट्रकने 7 महिलांना चिरडलं


5 जणींचा मृत्यू,चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात
सोलापूर
सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथे एका ट्रकने सात महिलांना धडक दिली आहे. या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीर जखमी आहेत.चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील चिकमहूद बंडगरवाडी परिसरात काम झाल्यानंतर काही महिला कामगार वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. यावेळी कोळसा वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि वाहनाने महिलांना धडक दिली.

Advertisement

ट्रकने चिरडल्यामुळे पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या महिलांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे. अपघातानंतर ट्रकमधील एक जण पळून गेला आहे तर एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या महिलांवर काळाने घाला घातल्याने सांगोला परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!