विविध कला सादर करून भरत मुनींचे स्मरण


संस्कार भारती सातारा जिल्हा समितीतर्फे कार्यक्रम
सातारा

नाट्यशास्त्राचे रचनाकार भरतमुनी यांचा स्मरण दिन संस्कार भारतीच्या सातारा जिल्हा समितीतर्फे विविध कलाप्रकार सादर करून साजरा करण्यात आला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमामध्ये विविध कलाकारांनी आपल्या गुणांचे दर्शन उपस्थितांना घडवले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कायदे सल्लागार ऍड सुधीर गोवेकर आणि सामाजिक कार्यकर्ते विकास गोसावी उपस्थित होते संस्कार भारती जिल्हा समितीचे अध्यक्ष दिलीप चरेगावकर यांनी ऍड गोवेकर आणि विकास गोसावी यांचा सत्कार केला यावेळी व्यासपीठावर संस्कार भारती जिल्हा समितीचे उपाध्यक्ष संजय दीक्षित सहकार्यवाह संजीव आरेकर ज्येष्ठ मार्गदर्शक रेखा बंड उपस्थित होत्या रेखा बंड यांनी संस्कार भारतीची माहिती दिली
प्रमुख पाहुणे सुधीर गोवेकर आणि विकास गोसावी यांनी आपल्या भाषणामध्ये संस्कार भारतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले अशा उपक्रमामुळे कलाकारांच्या गुणांना प्रोत्साहन मिळते असे त्यांनी सांगितले
यावेळी जेष्ठ पत्रकार आणि न्यूजमंडी न्यूज पोर्टलचे संपादक मुकुंद फडके यांनी नाट्यशास्त्राचे जनक भरतमुनी यांच्या कार्याचा आढावा घेतला भरतमुनी यांनी लिहिलेले नाट्यशास्त्र ही भारताने जगाला दिलेली देणगी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि नाट्यशास्त्रातील विविध पैलूंना स्पर्श केला
यावेळी विविध कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या त्यामध्ये वैभव फडतरे यांनी नांदी गाऊन आणि नाट्यगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यांना संवादिनीवर अमित जगदाळे आणि तबल्यावर डांगोरे सर यांनी साथ केली वर्षा साबडे यांनी ती फुलराणी या नाटकातील तुला शिकवीन चांगलाच धडा हा प्रसंग एकपात्री अभिनयाने सादर केला डॉ सुनील देशपांडे यांनी रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातील प्रसंगाचे अभिवाचन केले भानूदास गायकवाड यांनी म्हणींवर आधारित एका लोकगीताची रचना सादर केली रसिक कलामंच या संस्थेच्या बालकलाकारांनी त्यांच्या गाजलेल्या पार्टी या बाल नाट्याचे सादरीकरण अभिवाचनाच्या माध्यमातून केले सौ नेहा घाडगे आणि अस्मिता भालेराव यांनी भरतनाट्यम नृत्याच्या माध्यमातून भरतमुनींनी स्पष्ट केलेल्या काही रसांचे सादरीकरण केले कल्याणी गायकवाड यांनी भैरवी सादर केली
यावेळी ईशान केसकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला
यावेळी प्रसिद्ध चित्रकला शिक्षक शेखर हसबनीस यांचे शिष्य चित्रकार ऋत्विक कुंभार यांनी हे सर्व प्रसंग सादर होत असताना त्याची प्रत्यक्ष चित्रे काढून रसिकांना एका वेगळ्या अनुभवाची मेजवानी दिली व्यासपिठावर चालू असलेल्या प्रत्येक प्रसंगाचे चित्रण त्याने आपल्या ब्रशच्या माध्यमातून कॅनव्हासवर केले

Advertisement

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका केसकर यांनी केले त्यांना रेश्मा वाळिंबे आणि सानिका केसकर यांनी साहाय्य केले

वर्षा साबडे यांनी आभार प्रदर्शन केले

पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

यावेळी उज्वला देवी आणि ऋतुजा देवी यांनी काढलेली देखणी रांगोळी सुद्धा आकर्षणाचे केंद्र ठरले

कार्यक्रमाला संस्कार भारती साताराचे पदाधिकारी आणि सातारकर रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!